ना. अदिती तटकरे वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डने सन्मानित

महाराष्ट्र राज्याच्या राज्यमंत्री तसेच रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री ना. अदिती तटकरे यांनी कोविडच्या कठीण व आव्हानात्मक काळात जिल्हावासियांसाठी केलेल्या भरीव कार्यासाठी नुकतेच त्यांना लंडन स्थित वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड या संस्थेतर्फे सन्मानित करण्यात आल्याचे समजताच ना. अदिती तटकरे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव करण्यात आला. ना. अदिती तटकरे यांची महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातील अत्यंत संवेदनशील व अभ्यासू मंत्री म्हणून ओळख असून कोविडच्या कठीण काळात त्यांनी अक्षरशः पायाला भिंगरी लावल्यासारखी भ्रमंती करत रायगड व रत्नागिरीमध्ये प्रभावी काम केले. या कामाची जागतिक स्तरावरील संस्थेने दखल घेतल्याबद्दल अनेकांनी समाधान व्यक्त करून ना. तटकरेंचे अभिनंदन केले व त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*