सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर नितेश राणे यांनी हायकोर्टात धाव घेतली होती.
आमदार नितेश राणे यांच्या जामीन अर्जावर उच्च न्यायालयात सुनावणी झाली.न्यायाधीश सीव्ही भडंग यांच्या पीठासमोर ही सुनावणी पार पडली. या प्रकरणी पुढील सुनावणी १२ जानेवारी रोजी होणार आहे.आज नितेश राणें याचा वतीने ज्येष्ठ कायदेतञ् ऍड नितीन प्रधान प्रतिज्ञापत्र सादर करण्यासाठी वेळ मागितली. त्यानंतर पुढील सुनावणीपर्यंत नितेश राणेंवर अटकेची कारवाई करू नये असे उच्च न्यायालयाने राज्य सरकारला आदेश दिले आहेत. पुढील सुनावणी मुंबई उच्च न्यायालयात बुधवारी 12 जानेवारीला पुन्हा होणार आहे. आज मुबंई उच्च न्यायालयात व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सुनावणी झाली.
