रत्नागिरी : निलीमा चव्हाण मृत्यूप्रकरणी स्टेट बँक अधिकारी संग्राम गायकवाड या अधिकाऱ्यावरती अटकेची कारवाई झाली. याप्रकरणी आता निलीमा चव्हाण हिने यूट्युब सोशल मीडियावर केलेल्या सर्चिंगची मोठी माहिती पोलीस तपासात समोर आली आहे.

यामध्ये तिने नैराश्यातूनच जीवन संपवण्याचा मार्ग, काय केल्याने जीवावर बेतू शकते, जीवनात यशस्वी होण्याची कला अशा स्वरूपाचं काही सर्चींग केल्याची माहिती पोलीस तपासात पुढे आली आहे.

२२ जुलैपासून तिने हे सर्चिंग केल्याची माहिती तपासात समोर आली आहे. निलीमा चव्हाण यांचा मोबाईल व बॅग जगबुडी नदीत चार ते पाच दिवस पोलिसांनी सर्च ऑपरेशन करूनही या दोन्ही वस्तू मिळाल्या नाहीत.

गुगल अकाउंटवरून पोलीस तपासात ही मोठी माहिती समोर आल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले आहे. २२ जुलैपासून तिने हे सर्चिंग केल्याची माहिती तपासात समोर आली आहे.

निलीमा चव्हाण यांचा मोबाईल व बॅग जगबुडी नदीत चार ते पाच दिवस पोलिसांनी सर्च ऑपरेशन करूनही या दोन्ही वस्तू मिळाल्या नाहीत. गुगल अकाउंटवरून पोलीस तपासात ही मोठी माहिती समोर आल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले आहे.

त्यातून तिची मानसिक नैराश्याची टोकाची स्थिती लक्षात यावी आणि ती कोणत्यातरी दबावाखाली होती त्यामुळेच तिने अशा स्वरूपाचे सर्चिंग केले असावे हा प्राथमिक अंदाज पोलीसांचा आहे.

त्यामुळे निलीमा चव्हाण हिचा झालेला मृत्यू हा तिच्या मानसिक नैराश्यातूनच टोकाचं पाऊल उचलले असल्याने झाला अशी माहिती पोलीस तपासात समोर आली आहे.

याप्रकरणी आत्महत्या करण्यास चिथावणी दिल्याचा गुन्हा स्टेट बँकेच्याअधिकाऱ्यावर दाखल झाला आहे.