मी सक्रिय राजकारणातून कायमचा बाजूला होत आहे, आता राजकरणात मन रमत नाही, इतर काही कारण नाही, असं ट्विट करत निलेश राणे यांनी आपला निर्णय जाहीर केला आहे. माजी खासदार निलेश राणे यांनी अचानक असा निर्णय घेतल्यानं त्यांच्या समर्थकांना मोठा धक्काच बसला आहे.

दसऱ्याच्या दिवशीच निलेश राणेंनी हा निर्णय जाहीर केल्यामुळे तर्कवितर्कांना जोर आलं आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे की,

“मी सक्रिय राजकारणातून कायमचा बाजूला होत आहे, आता राजकरणात मन रमत नाही, इतर काही कारण नाही. मागच्या 19/20 वर्षा मध्ये आपण सगळ्यांनी मला खूप प्रेम दिलं, कारण नसताना माझ्या सोबत राहिलात त्या बद्दल मी आपला खूप आभारी आहे.”

https://twitter.com/meNeeleshNRane/status/1716709978227290112?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1716709978227290112%7Ctwgr%5E65f52f81256b2b6b000bc1d666ecc96af7c8ad52%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fratnagiri24news.com%2F%3Fp%3D59035
निलेश राणे ट्विट

“BJP मध्ये खूप प्रेम भेटलं आणि BJP सारख्या एका उत्तम संघटनेत काम करण्याची संधी मिळाली त्या बद्दल मी खूप नशीबवान आहे. मी एक लहान माणूस आहे पण राजकरणात खूप काही शिकायला मिळालं आणि काही सहकारी कुटुंब म्हणून कायमचं मनात घर करून गेले, आयुष्यात त्यांचा मी नेहमी ऋणी राहीन.”

गेली 20 वर्ष निलेश राणे सक्रिय राजकारणात आहेत. त्यांनी अनेक निवडणुका देखील लढवल्या आहेत. मात्र आता निडवणुका लढवण्यात आपल्याला रस नाही, असे म्हणत निलेश राणे यांनी राजकारणातून बाहेर पडण्याची घोषणा केली आहे.

खा. नारायण राणे, आ. नितेश राणे यांची अद्यापही यावर प्रतिक्रिया आलेली नाहीये.