रत्नागिरी | प्रतिनिधी
सिंधुदुर्गातील आणखी एक नेत्याचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. भाजपचे नेते माजी खासदार निलेश राणे यांंना कोरोना विषाणूचा संसर्ग झाला आहे. निलेश राणे यांनी स्वतः ट्विट करून ही माहिती दिली आहे.
निलेश राणे यांनी केलेल्या ट्विट नुसार काही प्राथमिक लक्षणे दिसल्याने मी स्वतः कोरोना चाचणी केली असता कोव्हीड १९ चा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. माझी तब्येत उत्तम असून डॉक्टरी सल्ल्याने स्वतःला क्वारनटाईन केले असून जे संपर्कात आले आहेत त्यांनी स्वतःची चाचणी करावी असे आवाहन निलेश राणे यांनी या ट्विट द्वारे केले आहे.
कोरोनाची प्राथमिक लक्षणे दिसल्याने चाचणी केली असता माझा कोविड-19 रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. माझी तब्ब्येत उत्तम असून डॉक्टरांच्या सल्ल्याने मी स्वतःला सेल्फ क्वारंटाईन करून घेतले आहे. गेल्या काही दिवसात माझ्या संपर्कात आलेल्या सर्व व्यक्तींनी स्वत:ची चाचणी करावी.
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) August 16, 2020
कोरोनाचा प्रादुर्भाव कोकणात चांगलाच वाढला आहे. कणकवलीचे आ. वैभव नाईक, संदेश पारकर यांनाही यापूर्वी कोरोना झाला होता. आता माजी खासदार निलेश राणे यांचा कोरोना झाल्यानं सर्वांनी स्वतःची काळजी घेणं आवश्यक बनलं आहे.