नारायण राणे यांच्या प्रचारासाठी निलम राणे मैदानात

संगमेश्वर : लोकसभा निवडणुकीत रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून भाजपाच्या नारायण राणे यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर महिला मोर्चाच्या रणरागिणींच्या उत्साहाला उधाण आले असून मित्र पक्षांच्या महिला पदाधिकाऱ्यांच्या साथीने निलम राणे, माधवी माने व भाजपा प्रदेश उपाध्यक्षा प्रा. वर्षा भोसले यांच्या नेतृत्त्वात संगमेश्वर तालुक्यात झंझावाती प्रवास केला असून भाजपा जिल्हाध्यक्षा सुजाता साळवी, शिवसेना महिला जिल्हाप्रमुख शिल्पा सुर्वे, प्रदेश सचिव शिल्पा मराठे, दिपलक्ष्मी पडते, अपर्णा पाटील, संगीता जाधव, नुपूरा मुळ्ये, दिपिका जोशी, तालुकाध्यक्षा शीतल दिंडे, स्नेहा फाटक आदी पदाधिकाऱ्यांनी या दौऱ्यात आपले योगदान दिले.

आंबेड बु. येथे उन्मेष मुळ्ये यांच्या घरी महिलांची बैठक संपन्न झाली. यानंतर सोनगिरी, मुस्लीम मोहल्ल्यात मुस्लीम महिलांशी संवाद साधून पुढे आरवली, भुवडवाडी येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवीण भुवड यांच्या निवासस्थानी महिलांना संबोधित केले. यानंतर माखजन, बौद्धवाडी येथील माता रमाई संघाच्या महिलांजवळ हितगुज साधत लोवले येथे प्रियंका साळवी यांच्या घरी महिलांना मतदानाचे आवाहन केले.

पुढे आंबव सुतारवाडी येथे माधवी अधटराव यांनी आयोजित केलेल्या महिला बैठकीत आपली भूमिका मांडून उद्योजक सुखदेव जाधव यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. संगमेश्वर (द.) तालुकाध्यक्ष यांच्या हातिव येथील निवासस्थानी महिलांना मार्गदर्शन करून भारतीय जनता पार्टीचे नेते, महायुतीचे लोकसभेचे उमेदवार नारायणराव राणे यांना प्रचंड बहुमताने विजयी करा असे आवाहन करण्यात आले.

यावेळी भाजपा महिला मोर्चा जिल्हा सरचिटणीस सौ. वर्षा ढेकणे, भाजयुमो जिल्हा सरचिटणीस श्रद्धा इंदुलकर, महिला मोर्चा जिल्हा उपाध्यक्षा अक्लिमा परदेशी, मा. नगराध्यक्षा मृणाल शेट्ये, मा. नगरसेविका रेश्मा किर्वे, सौ. मनस्वी आंबेकर, भाजपाच्या ज्येष्ठ जिल्हा चिटणीस कोमल रहाटे, शीतल पंडित, स्वाती राजवाडे, जिल्हा सोशल मिडिया सहसंयोजिका शिवानी सावंत, ऍड. स्वाती गोडे, सरिता आंबेकर, उपाध्यक्षा श्रेया मोहिते, सुमन झगडे, मुग्धा भिडे, समृद्धी वेलवणकर, श्रीयांका गुरव, आराध्या निकम, वैष्णवी चव्हाण, प्राजक्ता भुवड, सविता पवार, श्वेता सुरेश कांगणे, रुपाली कदम, विशाखा कदम, सुशीला कातकर, अनुश्री पाटणे, ज्येष्ठ भाजपा कार्यकर्त्या अमिता पाटणे, श अपर्णा शिगवण, फराह मुजावर, योगिता फटकरे, रक्षिता धामणस्कर आदी महिला पदाधिकाऱ्यांसह चिपळूण-संगमेश्वर विधानसभा निवडणूक प्रमुख प्रमोद अधटराव, तालुकाध्यक्ष रूपेश कदम, तालुका उपाध्यक्ष राजेश आंबेकर, प्रशांत रानडे, महेश (बावा) जड्यार, गणेश साठे, सोशल मिडिया जिल्हा संयोजक अमोल गायकर, वॉर रूम प्रमुख प्रसाद भिडे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*