
मुंबई: श्रीराम नवमीच्या निमित्ताने भक्ती आणि संगीताचा संगम असलेले ‘रामराया’ हे नवे मराठी भजन रसिकांच्या भेटीला आले आहे.
राम या संकल्पनेचा शोध घेणारे हे गाणे अल्पावधीतच भाविकांच्या पसंतीस उतरले आहे.
सोबतीचा राम, मर्यादा पुरुषोत्तम आणि अंतरीचा राम अशा विविध रूपांचा अर्थ या भजनाच्या माध्यमातून उलगडण्यात आला आहे.
या भावस्पर्शी भजनाचे लेखन वर्षा राजेंद्र हुंजे यांनी केले असून, राष्ट्रीय पुरस्कार विजेती गायिका सावनी रवींद्र हिने हे भजन गायले आहे.
संगीतकार आणि संयोजक निनाद सोलापूरकर यांनी याला पारंपरिक आणि आधुनिक संगीताची जोड दिली आहे.
बँक ऑफ महाराष्ट्रच्या सहकार्याने आणि श्रिया क्रिएशनच्या निर्मितीतून हे गाणे साकारले गेले असून ते श्रिया क्रिएशनच्या युट्युब चॅनलवर उपलब्ध आहे.
धकाधकीच्या जीवनात रामाचा शोध घेणारा हा एक सुरेल प्रयत्न असल्याचे निर्मात्यांनी म्हटले आहे.

Leave a Reply