दापोली : दापोली आगाराला नव्या मिळालेल्या बीएस प्रणालीच्या बसेस विविध मार्गांवर कार्यान्वित करण्यात आल्या असल्याची माहिती आगारातून देण्यात आली आहे. नव्या बसेसमुळे दापोलीतून धुळे मार्गावर थेट सेवा सुरू करण्यात आली आहे.
स. 6.30 वाजता दापोली-नाशिक-धुळे व पहाटे 5.15 वाजता धुळे नाशिक-दापोली या मार्गावर दोन बसेस, स. 6 वाजता दापोली-मुंबई व रात्रौ 11 वाजता मुंबई-दापोली या मार्गावर 1 बस, स. 6.30 दापोली जलद रत्नागिरी दु. 12.30 रत्नागिरी-दापोली, सायंकाळी 4 वाजता दापोली-चिपळूण, सायं. 6.15 वाजता चिपळूण-दापोली या मार्गावर 1 बस, स. 10 वाजता दापोली-मंडणगड-भाईदर व रा. 9.30 वाजता भाईंदर-खेड-दापोली या मार्गावर 1 बस, रात्रौ. 9.30 वाजता दापोली-खेड-भाईंदर व सकाळी 6 वाजता भाईंदर मंडणगड दापोली या मार्गावर 1 बस, स. 9.30 वाजता दाभोळ -मुंबई व रात्रौ 8.30 वाजता मुंबई-दाभोळ या मार्गावर 1 बस, रात्रौ. 9.45 दाभोळ -मुंबई व स. 6.30 ची मुंबई-दाभोळ या मार्गावर 1 बस अशा 8 बसेस देण्यात आल्या असून प्रवाशांचा या बसना चांगला प्रतिसाद मिळत असल्याची माहिती देण्यात आली आहे.