रत्नागिरी, खेड, चिपळूण आणि राजापूर तालुक्यामध्ये एनडीआरएफ सज्ज

रत्नागिरी– मुसळधार, जाेरदार पावसाची शक्यता असल्यामुळे जिल्ह्यात चार एनडीआरएफची पथके तैनात करण्यात आली आहे. अतिवृष्टीमुळे पूर, नैसर्गिक आपत्तीची शक्यता असल्याने हवामान विभागाने रेड अ‍ॅलर्ट दिला आहे. त्यासाठी राज्य शासनाने रत्नागिरी, खेड, चिपळूण आणि राजापूर या ठिकाणी ही पथके तैनात केली आहेत. यातील पथकाने काल रत्नागिरी तालुक्यातील काजळी नदी किनाऱ्यावरील धाेकादायक, पूरग्रस्त हाेणाऱ्या ठिकाणाची पाहणी केली.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*