नवनीत राणा यांच्या खासदारकीला धोका? सुप्रीम कोर्टात दाद मागणार

मुंबई : अपक्ष खासदार नवनीत राणा यांचं जात प्रमाणपत्र मुंबई हायकोर्टाने रद्द केलं आहे. कोर्टाच्या या निर्णयामुळे नवनीत राणा यांच्या अडचणी वाढल्या आहेत. खासदार नवनीत राणा यांना कोर्टाने दोन लाखांचा दंड देखील ठोठावला आहे. नवनीत राणा यांनी २०१९ साली शिवसेनेच्या आनंदराव अडसूळ यांना पराभूत केलं होतं.

लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर त्यांचे प्रतिस्पर्धी  माजी खासदार आनंदराव अडसूळ यांनी त्यांच्या जात प्रमाणपत्रावर आक्षेप घेत हायकोर्टात याचिका दाखल केली होती. मुंबई हायकोर्टाच्या न्यायमूर्ती धनुका आणि न्यायमूर्ती बिश्त यांच्या खंडपीठानं नवनीत राणा यांच्या विरोधात निकाल दिला आहे.

खासदारकीला धोका?

हायकोर्टाच्या निकालामुळे नवनीत राणा यांची खासदारी धोक्यात येऊ शकते, अशी माहिती उपलब्ध होत आहे. निवडणूक आयोगाला सादर केलेल्या प्रमाणपत्र किंवा प्रतिज्ञापत्र खोटं ठरलं तर संबंधित सदस्याच पद रद्द होऊ शकतं असा नियम आहे.

आमदार रवी राणा यांच्या त्या पत्नी

रवी राणा यांच्यासोबत झालेल्या लग्नानंतर त्यांनी चित्रपटसृष्टीला सोड चिठ्ठी दिली होती. रवी राणा महाराष्ट्र राज्यात विधानसभा सदस्य आहेत.

हायकोर्टाच्या निकालाचा आदर – राणा

खासदार नवनीत राणा यांनी मुंबई हायकोर्टाच्या निकालाबद्दल आदर व्यक्त केला आहे. पण मी हायकोर्टाच्या या निर्णयाबाबत सुप्रीम कोर्टात दाद मागणार असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. सुप्रीम कोर्टात मला नक्की न्याय मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*