नॅशनल हायस्कूल दापोलीत नवागत विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत

दापोली: मुस्लिम एज्युकेशन सोसायटी संचलित नॅशनल हायस्कूल दापोली येथे नवप्रवेशित विद्यार्थ्यांचे स्वागत मोठ्या उत्साहात संपन्न झाले. या स्वागत समारंभाला संस्थेचे पदाधिकारी, पालक आणि शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रथमच शाळेत पदार्पण करणाऱ्या विद्यार्थ्यांना पहिल्याच दिवशी पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात आले. संस्थेचे पदाधिकारी, मुख्याध्यापक अय्युब मुल्ला, ज्येष्ठ शिक्षक रियाज म्हैशाळे, ज्येष्ठ शिक्षिका फैरोजा सावंत, वर्गशिक्षिका नाजमीन म्हैशाळे आणि उपस्थित पालकांच्या हस्ते हे वाटप करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांना चॉकलेट्स देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले.

शाळेचा पहिला दिवस आणि नवीन वातावरण यामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर किंचित भीती दिसत होती. मात्र, शाळेतील शैक्षणिक साधनसामग्री आणि शिक्षकांनी सादर केलेल्या गमतीदार गोष्टींमुळे विद्यार्थी लवकरच रममाण झाले. त्यांच्या चेहऱ्यावरील भीती दूर होऊन हास्य फुलले.

शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष जावेद मणियार यांनी विद्यार्थ्यांना “भरपूर खेळा, भरपूर अभ्यास करा” असा संदेश दिला. सचिव इकबाल परकार यांनी पालकांना संस्था विद्यार्थ्यांना सर्वोत्तम सुविधा देण्यासाठी कटिबद्ध असल्याचे आश्वासन दिले. यावेळी गव्हर्निंग बॉडीचे चेअरमन लियाकत रखांगे आणि वुमन्स डिग्री कॉलेजचे प्राचार्य खतीब उपस्थित होते.

Advertisement

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*