नॅशनल हायस्कूल दापोलीचा 98.68% निकालाचा दैदिप्यमान यशस्वी पर्व, सात विद्यार्थी 90% पुढे

दापोली : येथील मुस्लिम एज्युकेशन सोसायटी संचलित नॅशनल हायस्कूलने यंदाच्या दहावीच्या परीक्षेत 98.68% निकालासह आपली उज्वल यशाची परंपरा कायम ठेवली आहे. एकूण 76 विद्यार्थ्यांपैकी 75 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, 25 विद्यार्थी विशेष प्राविण्यासह आणि 31 विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. सात विद्यार्थ्यांनी 90% पेक्षा जास्त गुण मिळवून प्रशालेचा मान उंचावला आहे.

टॉपर्सनी गाठले यशाचे शिखर
प्रशालेचा यंदाचा निकाल दैदिप्यमान ठरला असून, सालीम रयान साबीर खान याने 97.80% गुणांसह प्रशालेत प्रथम क्रमांक पटकावला. फातिमा अस्लम नदाफ हिने 96.60% गुणांसह द्वितीय, तर शेख अनस अब्दुल कयूम याने 95.80% गुणांसह तृतीय क्रमांक मिळवला. याशिवाय, शिमाज हसरत सौतिरकर (93.40%), शिरगावकर इरम मुख्तार (92.20%), डोंगरकर अमातुल्ला (91.80%) आणि मौलवी उमर इमरान खान (90%) यांनी 90% पेक्षा जास्त गुण मिळवून आपले नाव यशस्वी विद्यार्थ्यांच्या यादीत नोंदवले.

संस्थेकडून कौतुकाचा वर्षाव
या यशाबद्दल मुस्लिम एज्युकेशन सोसायटीचे गव्हर्निंग बॉडी चेअरमन लियाकत रखांगे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष जावेद मणियार, सचिव इकबाल परकार, कॉलेज कमिटी अध्यक्ष आरिफ मेमन, रफिक मेमन आणि मुख्याध्यापक अय्युब मुल्ला यांच्यासह सर्व पदाधिकाऱ्यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे आणि त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे तोंडभरून कौतुक केले.

यशाची परंपरा कायम
नॅशनल हायस्कूलने आपल्या सातत्यपूर्ण यशाने दापोलीच्या शैक्षणिक क्षेत्रात आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. या निकालाने विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले असून, पुढील वर्षीही असाच दमदार निकाल देण्याचा निर्धार प्रशालेने व्यक्त केला आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*