मुंबईच्या नसरी मोनजी स्कुल ऑफ सायन्सने ‘TP100’ म्हणजेच ‘टोटल प्रोटेक्शन मास्क’ची निर्मिती केली

मुंबईच्या नसरी मोनजी स्कुल ऑफ सायन्सने ‘TP100’ म्हणजेच ‘टोटल प्रोटेक्शन मास्क’ची निर्मिती केली आहे. हा देशातील पहिला ‘बॅटरी ऑपरेटेड मास्क’ असून या मास्कमध्ये बॅटरीसोबत कॉपर फिल्टरचा वापर करण्यात आला आहे. कोरोनाचा असेल किंवा अन्य कोणताही विषाणू , बॅक्टरीया या मास्कच्या संपर्कात येताच किंवा पृष्ठभागावर जमा होताच काही क्षणात नष्ट होतो. त्यामुळे मास्कच्या वापरामुळे पूर्णपणे आपण सुरक्षित राहणार असल्याचे, नसरी मुनजी स्कुल ऑफ सायन्सच्या ज्या प्राध्यापकांनी याची निर्मिती केली आहे त्यांनी हा दावा केला आहे.संशोधन झाल्यानंतर हा मास्क पूर्णपणे वापरासाठी तयार झाला असून आता लवकरच हा मास्क बाजारात येणार आहे. या मास्कच्या संशोधनाचे दोन पेटंट सुद्धा मिळाले असून 40 विविध डिझाइनमध्ये हे मास्क तयार करण्यात आले आहेतमास्कची बाहेरील बाजू वॉशेबल असून सहा महिन्यांपर्यत याची बॅटरी टिकू शकते. त्यामुळे साधारणपणे एक मास्क 6 महिने सहज वापरू शकत असल्याने साधारणपणे रोज वापरत असलेले 300 मास्क आपण वापरणे टाळू शकतो.या मास्कची किंमत बाजारात 800 ते 1200 रुपयांपर्यंत असणार आहे. त्यामुळे भविष्यात बाजारात जेव्हा हे मास्क येईल तेव्हा अनेकांना पूर्णपणे सुरक्षित ठेवण्यासाठी हा मास्क मदतगार ठरेल,असा विश्वास या प्राध्यापकांना आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*