नरेंद्र मोदी पुन्हा एका संकटात धावून आले; राज्यांची जबाबदारीही शिरावर घेतली : प्रवीण दरेकर

मुंबई : केंद्र सरकारच यापुढे सर्व वयोगटाचे लसीकरण करणार आहे. राज्यांना दिलेली 25 टक्के जबाबदारी देखील भारत सरकार उचलणार आहे. 21 जूनला आंतरराष्ट्रीय योग दिवशी 18 वर्षांवरील सर्व नागरिकांसाठी राज्यांना मोफत लस देणार आहे, अशी घोषणा पंतप्रधान मोदी यांनी केली. नरेंद्र मोदी यांच्या या घोषणेनंतर राज्यातील विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी त्यांचे आभार मानले आहेत. दरेकर ट्विट करत म्हणाले की, पुन्हा एकदा नरेंद्र मोदी संकटात धावून आले. नरेंद्र मोदी यांनी दोन महत्वाच्या आणि मोठ्या घोषणा केल्या असून राज्यांची जबाबदारीही त्यांनी आपल्या शिरावर घेतली आहे, असं प्रवीण दरेकर यांनी म्हटलं आहे. तसेच आता देशातील प्रत्येक नागरिकांचे मोफत कोरोना लसीकरण होणार असल्याचे सांगत, राज्याला लसीकरणासाठी खर्च करावा लागणार नाही, असं प्रवीण दरेकर यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*