नरेंद्र महाराज भक्तगणांनी बांधला श्रमदानातून वनराई बंधारा

दापोली : अनंत श्री विभुषित जगदगुरु रामानंदाचार्य श्री. स्वामी नरे़द्रचार्यजी महाराज, जगदगुरु रामानंदाचार्य दक्षिण पीठ नाणीजधाम महाराष्ट्र यांच्या वतीने दापोली तालुक्यातील दमामे-तामोंड ग्रामपंचायत हद्दीतील नदीवर नरेंद्र महाराज संप्रदाय सेवा समिती दापोली यांच्या श्रमदानातून वनराई बंधारा बांधण्यात आला आहे.

दापोली तालुक्यात पावसाळ्यात प्रचंड पाऊस पडत असतो. मात्र, पाणी साठवणुकीची व्यवस्था नसल्याने पाणी वाहून जाते. परिणामी, उन्हाळ्यात स्थानिकांना भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. या साठी सामाजिक उपक्रम म्हणून नरेंद्र महाराज संप्रदाय यांचे माध्यमातून बंधारे बांधणीतून योग्य वेळी पाणी अडविण्यावर भर दिला जात आहे.

पाणी अडविलेल्या बंधाऱ्यांचा उपयोग शेतीसाठी, जनावरांना पाणी पिण्यासाठी, कपडे धुणे आदींसाठी व्हावा तसेच पाण्यासाठी होणारी पायपीट थांबावी यासाठी वनराई बंधारे बांधून पाणी अडविण्याचा प्रयत्न  दापोली येथील नरेंद्र महाराज  संप्रदायाचे माध्यमातून सुरू करण्यात आला आहे. नरेंद्र महाराज संस्थानाचे अनेक सामाजिक उपक्रम राबविले जातात.

त्यामधील हा एक उपक्रम अग्रक्रमाने घेतला जातो. कोकणात पाण्याची उणिव ही प्रामुख्याने एप्रिल व मे महिन्यात जाणवते, त्यावर उपाय म्हणुन बंधारा बांधून पाणी अडविणे हा आहे. बंधारा बांधताना खाली सिमेंटच्या गोण्यांत खडी भरून त्या गोण्या एकावर एक रचून बांध तयार करण्यात आला आहे.

हा बंधारा येथील सरपंच गंगाराम हरावडे, पोलीस पाटील काशिनाथ हरावडे, संतोष बुरटे, सिद्धार्थ सावंत, कृषी पर्यवेक्षक हरिश्चंद्र मोगरे, कृषी सहाय्यक चंदा गावंडे, नरेंद्र महाराज सेवा समिती दापोली तालुका अध्यक्ष अजय खोपटकर, सरपंच संदिप घाग, उपसरपंच संजय घाग ग्रामसेवक जाधव, तंटामुक्त व वाडी अध्यक्ष वारे, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख तसेच दापोली पालक प्रतिनिधी विनायक पोळेकर, निरीक्षक सुनिल दाभोळकर, तालुका महिला अध्यक्षा रोहिणी धातकर, तालुका सचिव दत्ताराम दवंडे, माजी तालुकाध्यक्ष दिनेश जावळे, माजी महिला तालुकाध्या नम्रता धोपावकर, तालुका संजीवनी प्रमुख प्रिया दाभोळकर तालुका धमक्षेञ प्रमुख रेशमा लाकडे, तालुका ब्लड ईन निड प्रमुख प्रविण मळेकर, तालुका जनगणना प्रमुख प्राची म्हातले, तालुका सामाजिक उपक्रम प्रमुख विष्णू सापटे, तालुका प्रसिद्धी प्रमुख विनोद धोञे, महेश मळेकर, जान्हवी ओतारी, परेश वाडकर, मंगेश मुलूख, लक्ष्मण पागडे इ. मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*