रत्नागिरी : नागपूर-मडगाव अशी साप्ताहिक स्पेशल गाडी कोकण रेल्वेमार्गे २८ मार्च पर्यंत धावणार आहे. नागपूर-मडगाव मार्गावर धावणारी साप्ताहिक विशेष गाडी (०१२३७/३८) नागपूरहून दि.२१ फेब्रुवारी २०२१ ते २७ मार्च २०२१ या कालावधीत दर शुक्रवारी सायंकाळी ३ वाजून ५० सुटेल आणि दुसऱ्या दिवशी ४ वा. ३० मिनिटांनी गोव्यात मडगावला पोहचेल. परतीच्या प्रवासात ही गाडी २१ फेब्रुवारी ते २८ मार्च २०२१ कालावधीत दर शनीवारी सायंकाळी ७ वा. ४० मिनिटांनी सुटून दुसऱ्या दिवशी नागपूरला ती रात्री ८.३० वाजता पोहचेल. ही गाडी 13 वातानुकूलित,१पेंट्री कार, २ लगेज कम जनरेटर कार, अशा एकूण १६ डब्यांसह धावणार आहे. तर नागपूर-मडगाव मार्गावर धावणारी साप्ताहिक विशेष गाडी (०१२३५/३६) नागपूरहून दि.५ फेब्रुवारी २०२१ ते २७ मार्च २०२१ या कालावधीत दर शुक्रवारी सायंकाळी ३ वाजून ५० सुटेल आणि दुसऱ्या दिवशी ४ वा. ३० मिनिटांनी गोव्यात मडगावला पोहचेल. परतीच्या प्रवासात ही गाडी ०६ फेब्रुवारी ते २८ मार्च २०२१ कालावधीत दर शनीवारी सायंकाळी ७ वा. ४० मिनिटांनी सुटून दुसऱ्या दिवशी नागपूरला ती रात्री ८.३० वाजता पोहचेल. ही गाडी शयनयान वातानुकूलित, १पेंट्री कार, २ लगेज कम जनरेटर कार अशा एकूण २२ डब्यांसह धावणार आहे.