दापोली नगरपंचायतीमध्ये कोण बाजी मारणार? या माय कोकणच्या पोलमध्ये शिवसेनेनं आघाडी घेतली आहे. 2021च्या दापोली नगरपंचायतीसाठी 52 टक्के लोकांनी शिवसेनेला पसंती दिली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष 25 टक्के पसंती मिळवत दुसऱ्या क्रमांकावर दिसत आहे. मनसेला दापोली नगरपंचायतीसाठी 15 टक्के लोकांनी पसंती दिली आहे. भाजपा आणि काँग्रेसला अनुक्रमे 5 आणि 3 टक्के लोकांनी पसंती दर्शवली आहे.

ही आकडेवारी 14 तारखेच्या 9 वाजेपर्यंतची आहे. जवळपास 1200 लोकांनी या सर्व्हेमध्ये आपला सहभाग नोंदवला होता.

यापुढे देखील ‘माय कोकण’च्या माध्यमातून पोल घेतले जाणार आहेत. ‘माय कोकण’ चॅनेल youtubeवर Subscribe करून तुम्ही या सर्व्हे मध्ये सहभागी होऊ शकता.

कसं सहभागी व्हाल माय कोकणच्या सर्व्हेमध्ये?

मतदान करण्याची प्रक्रिया एकदम सोपी आहे. तुम्ही youtubeवर जाऊन my kokan चॅनेल search करा. त्यानंतर चॅनेल subscribe करा आणि community जाऊन आपल्या पसंतीच्या पक्षाला मतदान करा. तुमचं मतदान गोपनीय राहणार आहे.