देशातील मोठ्या शहरांत कोरोना संसर्गाची तिसरी लाट मंदावल्याचे दिसून येत आहे. यातच कोरोनामुळे रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत घसरण होत आहे.
दुसरीकडे छोट्या शहरांत आजही रुग्णालयात दाखल हाेणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत आहे किंवा ती स्थिरावली आहे.
दरम्यान मुंबईच्या रुग्णालयांत कोरोना रुग्णांची संख्या ६१% घटली आहे. तसेच दिल्लीच्या रुग्णालयांत २८%, चेन्नईत ३३% व बंगळुरूत ८% घट झाली आहे.
तज्ज्ञांच्या माहितीनुसार राज्यातील महानगरांत तिसऱ्या लाटेचा पीक येऊन गेला आहे. यामुळे पुढील २-३ आठवड्यांत रुग्णालयात दाखल कोरोना रुग्णांची संख्या ९०% पर्यंत कमी होईल.
गावांतही नवे रुग्ण घटत असल्याने पुढील आठवड्यापासून तेथेही रुग्णालयात भरती होणाऱ्या नव्या रुग्णांच्या संख्येत घट होऊ लागेल.