मुंबई विद्यापीठाच्या सिनेट सदस्यांची रामराजे महाविद्यालयास भेट

दापोलीतील मुंबई विद्यापीठ संलग्न रामराजे महाविद्यालयास मुंबई विद्यापीठाचे सिनेट सदस्य श्री राजन कोळंबेकर व श्री प्रदीप सावंत यांनी आज भेट दिली, या भेटीप्रसंगी कोव्हीड काळामध्ये ऑनलाईन शिक्षण प्रणालीचा आढावा त्यांनी घेतला, ग्रामीण भागामध्ये ऑनलाईन शिक्षण प्रणालीसाठी येणाऱ्या अडचणी,समस्या त्यांनी जाणून घेतल्या, विद्यापीठ स्तरावर या सर्व गोष्टींचा विचार निश्चितच केला जाईल, असेही त्यांनी यावेळी नमूद केले.

या भेटीदरम्यान ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना कशा प्रकारे इंटरनेट, नेटवर्क इत्यादींचा सामना करावा लागतो याचा देखील आढावा त्यांनी घेतला, कोव्हीड काळामध्ये रामराजे महाविद्यालयाच्या ऑनलाईन शिक्षण व्यवस्थापनेबाबत त्यांनी महाविद्यालयाचे कौतुक केले.

या भेटीस संस्थेचे संस्थापक श्री.संदीप राजपुरे, सौ, वेदिका राणे, प्रा.कुणाल मंडलिक, प्रा.दिपक पवार, प्रा.अरविंद मांडवकर आदी उपस्थित होते.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*