रत्नागिरी : जिल्ह्यात म्यूकरमायकोसीसवर उपचार घेणाऱ्या एका रुग्णाचा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. या आधी जिल्ह्यातील 2 रुग्णांचा केईएम रुग्णालय, मुंबई येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. यामुळे मृतांची संख्या 3 झाली आहे.

जिल्ह्यात म्यूकरमायकोसीसचे आतापर्यंत 8 रुग्ण आढळले. त्यात 3 मृत्यू असून 2 जणांवर येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत.