एम.आर.फार्मा या कंपनी आगीची डॉ. मोहितकुमार गर्ग यांचेकडून पहाणी

खेड – तालुक्यातील लोटे MIDC येथील औद्योगिक वसाहतीतील एम.आर.फार्मा कंपनीत बुधवारी सकाळी ११.१५ वा.सुमारास भीषण आग लागली होती. सदर घटनेत कोणीही जखमी झाले नसून घटनास्थळी दाखल झालेल्या अग्निशामक दलांकडून ही आग विझविण्यात आलेली आहे.

काही दिवसांपूर्वीच लोटे MIDC मधील घरडा केमिकल्स व त्यानंतर समर्थ केमिकल्स या कंपन्यांमध्ये लागलेल्या आगीमध्ये एकूण 09 कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता तर काही कामगार जखमी झाले होते. आज पुन्हा MR फार्मा या कंपनीत आगीची दुर्घटना घडल्याने औद्योगिक सुरक्षेच्या दृष्टीने रत्नागिरी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक डाॅ. मोहित कुमार गर्ग यांनी या घटनेची माहिती मिळताच तात्काळ लोटे येथील सदर घटनास्थळी भेट दिली.

पोलीस अधीक्षक यांनी कंपनी व्यवस्थापनाकडून घटनेबाबत माहिती घेऊन घटनास्थळाची पाहणी केली.तसेच या घटनेच्या अनुषंगाने तपासाच्या दृष्टीने सदर वेळी त्यांच्यासोबत उपस्थित असलेले उप विभागीय पोलीस अधिकारी, खेड विभाग श्री. शशीकिरण काशिद, खेड पोलीस निरीक्षक श्रीमती निशा जाधव यांना योग्य त्या सूचना दिल्या. सदर घटनेचा तपास खेड पोलीस करत आहेत.

 

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*