गेल्या 24 तासांत 27 हजारापेक्षा जास्त बाधितांची नोंद

नवी दिल्ली : जगभरात करोनाने पुन्हा एकदा हैदोस घातला आहे. भारतातही करोनाचा प्रकोप पाहायला मिळत असून मागील काही दिवसांपासून रुग्णांच्या संख्येत पुन्हा एकदा झपाट्याने वाढ होत आहे. वेगाने वाढणाऱ्या करोनामुळे लोकांच्या मनात धडकी भरत आहे. 27 हजारांहून जास्त करोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर दुसरीकडे ओमायक्रॉनच्या रुग्णसंख्येत देखील दिवसागणिक वाढ होत आहे.

करोनाचा धडकी भरवणारा आलेख एकदा पुन्हा समोर आला आहे. देशातील एकूण ओमायक्रॉन रुग्णांची संख्या 1,525 वर पोहोचली आहे. दिल्ली आणि महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. वाढत्या रुग्णसंख्येमुळे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका निर्माण झाला आहे. देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला असून रुग्णांची एकूण संख्या तीन कोटींवर पोहोचली आहे. आरोग्य मंत्रालयाने याबाबत माहिती दिली आहे.

आज केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 27,553 नवे रुग्ण आढळून आले आहेत. करोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा 4,81,770 वर पोहोचला आहे. देशातील करोनाग्रस्तांपैकी अनेकांवर रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

लाखो रुग्ण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. तर आतापर्यंत कोट्यवधी लोकांनी कोरोनाची लस घेतली आहे. वेगाने पसरणाऱ्या ओमायक्रॉनचा देशातील अनेक ऱाज्यांमध्ये संसर्ग झाला आहे. काही राज्यांनी वाढता धोका लक्षात घेऊन कडक निर्बंध लागू केले आहेत. तर काही ठिकाणी नाईट कर्फ्यू आहे.

दिल्लीमध्ये तर गंभीर परिस्थिती असून येलो अलर्ट देण्यात आला आहे. याच दरम्यान कोरोनाबाबत धडकी भरवणारी माहिती समोर आली आहे, येत्या काही दिवसांत करोनाच्या नव्या लाटेचा सामना करावा लागणार आहे. देशातील ओमायक्रॉन रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे नवी लाट येऊ शकते अशी माहिती एका रिसर्चमधून समोर आली आहे. ही लाट काही दिवसांसाठी असेल पण ती मोठ्या प्रमाणात लोकांना संसर्गित करेल असे म्हटले आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*