सुरत : दापोलीतील करीम कागदी यांचा नातू मोहम्मद शम्स हिशाम सय्यद यानं सुरतमध्ये चकमदार कामगिरी केली आहे. येथील सरदार वल्लभभाई नॅशनल  इंस्टिट्यूट ऑफ़ टेक्नोलॉजी मधून  B.Tech. Mechanical Engineering या शाखेत विशेष प्रावीण्यासह मोहम्मद शम्सनं पदवी प्राप्त केली आहे. सध्या तो सर्वांच्या कौतुकास प्राप्त ठरत आहे.

इंडियन स्कूल मस्कत ( CBSE) पाठ्यक्रमाच्या शाळेतुन त्याने आपले के.जी. ते बारावी पर्यंत चे शिक्षण पूर्ण केले आहे. बारावी  सायंस  विभागात  मेरिट मध्ये येऊन त्याने भारताच्या प्रमुख NITs मध्ये असलेल्या  SVNIT Surat येथून आपली पदवी प्राप्त केली आहे. वडील हिशाम सय्यद मूळ रहिवासी मुंबके ता. खेड व आई शाहीन सय्यद तसेच त्याचे शिक्षक यांच्या मार्गदर्शना खाली हे यश प्राप्त केले आहे. सर्व स्तरातून त्याचं अभिनंदन केले जात आहे.