दापोली खेड मंडणगड विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे विद्यमान आमदार योगेश कदम व राष्ट्रवादीचे माजी आमदार संजय कदम यांच्यात विकासकामांच्या भूमिपूजनावरून संघर्ष सुरु झाला आहे. शिवसेना नेते माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांचे सुपूत्र योगेश कदम यांनी थेट विधानपरिषद उपाध्यक्षांकडे संजय कदम यांच्याविरोधात हक्कभंग प्रस्तावाची तक्रार दाखल केली आहे. ही तक्रार उपाध्यक्ष महोदयांनी स्वीकारुन पुढील कारावाईसाठी हक्क भंग समितीकडे देण्यात आल्याची माहिती आमदार योगश कदम यांनी दिली. ते की,माजी आमदार संजय कदम हे आता आमदार नाहीत पण जनतेची दिशाभूल करण्यासाठी विधानसभा मतदारसंघात भूमिपूजन करत फिरत आहेत त्यांच्या विरोधात विधानसभेत हक्कभंग प्रस्तावासाठी विधानसभा आपण उपाध्यक्षांना पत्र दिले आहे अशी माहिती दापोली मंडणगड खेड विधानसभा मतदारसंघाचे आमदार योगेश कदम यांनी सोमवारी ७ जानेवारी रोजी दापोलीत आयोजित पत्रकार परिषदेत दिली. नियम ७३ अन्वये हे पत्र विधानसभा उपाध्यक्ष महोदयांनी स्वीकारून पुढील कायदेशीर कारवाईसाठी हक्कभंग समितीकडे दिले आहे अशी माहिती  योगेश कदम यांनी व्यक्त केला.              

आपण आमदार नसताना जे करून दाखवले ते आमदार असताना संजय कदमना करता आले नाही अशी टीका आमदार योगेश कदम यांनी पत्रकार परिषदेत केली.  मुख्यमंत्री सडक योजनेतील रस्त्याचे भूमिपूजन केले अशी अनेक भूमि पूजने करून नावाच्या मागे केवळ मा.आ.पुढे स्वताचे नाव लिहुन जनतेची दिशाभूल संजय कदम करत आहेत त्यांना आता ते आमदार नाहीत याचे भान नसावे त्यांचे मानसिक संतुलन बिघडले असावे अशी बोचरी टीका आमदार योगेश कदम यांनी केली.      

मुखमंत्री ग्रामसडक योजनेमधून मंजूर झालेला दापोली तालुक्यातील करंजाळी पावनळ, कात्रण रस्ता खडीकरण करणे व डांबरीकरण करणे या कामाचा कार्यादेश मिळाल्यावर संजय वसंत कदम (माजी आमदार) यांनी २५ जानेवारी २०२२ रोजी भूमिपूजन केले. या पाटीवर  मा.आ.संजयराव कदम, दापोली मंडणगड खेड विधानसभा मतदारसंघ व राष्ट्रवादीच्या पदाधीकाऱ्यांची नावे असा मजकूर लिहून माझा आमदार म्हणून हक्क डावलून जनतेची दिशाभूल करत आहेत असा गंभीर आरोप आमदार योगेश कदम यांनी केला आहे२०१४ ते १९ या कालावधीत मंजूर झालेल्या विकासकामांची भूमीपूजन करण्याचा अधिकार देखील मजी आमदाराला नसतो एकदा पडल्यावर ते अधिकार आमदार म्हणून पुढे आपल्याकडे येतात. याची जणीवही संजय कदम यांना नाही.  नियम व अभ्यास न कळणारे गावठी माजी आमदार  आता मी नाही जनताच म्हणते संजय कदम गावठी आमदार होता त्यांच्याकडून कोणत्याही नियमांची माहीती असण्याची अपेक्षा नाही अशी बोचरी टिका आमदार योगेश कदम यांनी केली.भूमिपूजन करायची पाटीवर पक्ष्याच्या पदाधिकाऱ्यांची नाव त्यामुळे जनाधार संपत चलल्याची जाणीव संजय कदम यांना झाल्याने जनतेची दिशाभूल करत आहेत अशीही टीका त्यांनी केली.           

पंचायत समिती सभापती विरोधातही तक्रार करणार

दापोली तालुका पंचायत समिती सभापती योगिता बांद्रे यांच्यावरही त्या चुकीच्या पद्धतीने भूमिपूजन करत असल्याने आपण हक्कभंग पत्र देणार असल्याचे योगेश कदम यांनी सांगितले.   या सगळ्या पार्श्वभूमीवर आता राष्ट्रवादीचे माजी आमदार संजय कदम येत्या काळात कोणती भूमिका या सगळ्या वादाविषयी घेतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

शिवस्मारकाचे उद्घाटन ना.आदित्य ठाकरे यांच्याहस्ते होणार

दापोली शहरातील उभारण्यात आलेल्या शिवस्मारकाचे छत्रपती शिवाजी महाराजांचा आश्वारुढ पुतळा उद्घाटन युवासेना पक्षप्रमुख पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते व्हावे यासाठी आपण संपर्क करून ना.आदित्य ठाकरे यांना पत्र दिले आहे त्यांची वेळ तारीख मिळाली की या शिवस्मारकाचे उद्घाटन होईल अशी माहिती आमदार योगेश कदम यांनी पत्रकार परिषदेत दिली. या पुतळ्यासाठी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, तत्कालीन पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी अडीच कोटी रुपयांचा निधी दिला. शिवपुतळ्यासाठी सुमारे ४५ ते ५० लाख रुपयांचा सीएसआर फंडातून निधी आणला अशी माहीती आमदार योगेश कदम यांनी दिली. शिवपुतळयाबाबत मला कोणतेही राजकारण करायच नाही छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा सगळ्यांचा आहे अशी माहिती आमदार योगेश कदम यांनी दिली. येथे शिवसृष्टी उभारून ताम्र पपटावर इतिहास लिहिला जाणार आहे  आज जे सांगत आहेत त्या माजी आमदार सूर्यकांत दळवी यांना २५ वर्षात जमले नाही ते आम्ही पाच वर्षात करून दाखवले असा टोलाही आमदार योगेश कदम यांनी लगावला.

या पत्रकार परिषदेला भगवान घाडगे,उन्मेश राजे,प्रदिप सुर्वे,प्रकाश कालेकर, नदीम मुकादम आदी कार्यकर्ते उपस्थित होते.