मुंबई-गोवा महामार्ग हे कोकणवासीयांचे स्वप्न होते आणि यामुळेच माजी मंत्री अनंत गीते व खासदार विनायक राऊत या सर्वांनी हा महामार्ग झालाच पाहिजे असे ठरवले होते. त्याप्रमाणे त्या वेळचे व आत्ताचे बांधकाम मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत भूमिपूजन होऊन महामार्गाच्या कामाला जोरदार सुरुवात झाली होती आणि हे स्वप्न पूर्ण होणार असा विश्वास आम्हाला होता परंतु आता ही महामार्गाचे काम पूर्णपणे ठप्प झाले असून यासंदर्भात खासदार विनायक राऊत यांच्या नेतृत्वामध्ये अनेक बैठका झाल्या व मार्ग देखील काढण्याचा प्रयत्न केला परंतु हे काम पुढे जातच नाही. आता लोकांच्या भावनांचा उद्रेक झाला आहे. त्यामुळे शिवसेना आता रस्त्यावर उतरून लोकांच्यासाठी आंदोलन करणार आहे असे आमदार राजन साळवी यांनी पत्रकार परिषदेमध्ये केले.

या महामार्गाच्या कामाला अकरा वर्ष उलटली आहेत संपूर्ण भारतात असे महामार्गाचे काम कुठेच रखडलेले असू शकत नाही त्यामुळे लोकांच्या चीड निर्माण झाली आहे लोकांच्या या भावनेची दखल घेऊन शिवसेनेसह महाआघाडीतील सर्व घटक२७ तारखेला रास्ता रोकोसारखे आंदोलन करून लोकांच्या भावना केंद्र शासनापर्यंत पोहोचविणार असल्याचे जिल्हाप्रमुख विलास चाळके यांनी सांगितले