खेडमध्ये सोसाट्याचा वारा व मुसळधार पाऊस
खेड (प्रतिनिधी) : भाजपाचे आमदार आणि धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर याची कोकणातील धनगर जागृती सभा खेड येथे आयोजित केली होती.
सभेकरीता ते हेलिकॉप्टरमधून येणार होते. खेड भागात सोसाट्याचा वारा आणि मुसळधार पाऊस असल्याने आमदार पडळकर यांचे हेलिकॉप्टर जवळपास अर्धा तास हवेत भरकटत होते.
त्यानंतर वारा कमी झाल्यानंतर नियोजित ठिकाणी सुरक्षित रित्या उतरले. त्यांचे समवेत स्वीय सहाय्यक व अंगरक्षक होते.
हेलिपॅडवर मुसळधार पाऊस सुरु होता. तेथे ते माध्यमांच्या प्रतिनिधींनी जवळ बोलत होते. ते म्हणाले, गेल्या ७० वर्षांपासून कोकणातील धनगर समाज संघर्ष करीत असून पावसामुळे जरी हेलिकॉप्टर उतरण्यासाठी विलंब झाला असला तरी आमच्या पाठीशी लोकांचे आशीर्वाद आहेत.
त्यामुळे हेलिकॉप्टर पावसातही सुरक्षितपणे उतरले. कोकणातील धनगर समाज हा नेहमीच वंचित आणि उपेक्षित राहिला आहे.
त्यामुळे कोकणातील बांधवांना भेटून त्यांना राज्यातील धनगर समाजाच्या प्रवाहात घेऊन पुढे नेण्याचा प्रयत्न आम्ही करीत आहोत. राज्यभरातील धनगर समाजाला एसटी वर्गाचे आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत संघर्ष करु, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.