दापोली : शिवसेना पक्षाचे प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्रातील विरोधी पक्ष नेतेपदी आ. भास्कर जाधव यांची शिफारस केली आहे.
या शिफारसीबद्दल दापोली विधानसभाक्षेत्र प्रमुख मुजीब रूमाने, जिल्हा सरचिटणीस अनिल जाधव, तालुका प्रमुखफं ऋषी गुजर, तालुका सरचिटणीस नरेंद्र करमरकर आणि शहर प्रमुख संदीप चव्हाण यांनी अभिनंदन केलं.
दापोलीतील राजकीय घडामोडींवर चर्चा करण्यासाठी यावेळी आ. भास्कर जाधव यांच्यासोबत बैठक आयोजित करण्यात आली.
यावेळी पक्षाच्या संघटनात्मक मजबुतीसाठी दापोली मतदारसंघात मी स्वतः अधिक लक्ष देईन, असा विश्वास आ. भास्कर जाधव यांनी शिवसैनिकांना दिला.
तसेच, लवकरच दापोली, मंडणगड आणि खेड येथील दौऱ्याचे नियोजन करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.
या दौऱ्यात पक्षाच्या कार्यकर्त्यांना उद्देशून चर्चा आणि बैठका घेतल्या जाणार आहेत, ज्यामुळे पक्षाची अधिक मजबूत संरचना तयार होईल, असेही ते म्हणाले.