जालना-ब्रॉडगेज असलेल्या देशातील सर्व मार्गाचे सन २०२३ पर्यंत विद्युतीकरण पूर्ण केले जाणार. तसेच ज्या ब्रॉडगेज रेल्वे मार्गाचे विद्युतीकरण केलं जाणार आहे त्या मार्गावर देशभरात ४०० वंदे भारत रेल्वे सुरू करणार असल्याची घोषणा केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केली. श्री.दानवे यांच्या हस्ते आज मनमाड-मुदखेड रेल्वे मार्गाच्या विद्युतीकरणाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
श्री.दानवे यांनी मुंबई ते नागपूर बुलेट ट्रेन सुरू करण्यासाठी वेगाने काम सुरू असून या महिन्यात बुलेट ट्रेनसाठीचा डीपीआर निघणार आहे. मुंबई-नागपूर बुलेट ट्रेनसाठी केवळ 38 टक्के जमीन कमी पडत असून ही जमीन संपादित करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, असेही दानवे यांनी सांगितले.
यावेळी व्यासपीठावर केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांचीही उपस्थिती होती.