मुंबई – महाराष्ट्राचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी आपल्या संपूर्ण कुटुंबासह एक खास Ghibli स्टाइल फोटो काढून सोशल मीडियावर शेअर केला आहे.
या अनोख्या फोटोमध्ये योगेश कदम यांच्यासह त्यांचे वडील व माजी पर्यावरण मंत्री तसेच शिवसेना नेते रामदास कदम, त्यांची आई, पत्नी श्रेया कदम आणि त्यांची दोन्ही मुलं Ghibli स्टाइलमध्ये दिसत आहेत. हा फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे.

Ghibli स्टाइल ही जपानी ॲनिमेशन स्टुडिओ घिबलीच्या चित्रपटांमधील खास शैली आहे, जी हायाओ मियाझाकी यांच्या कलाकृतींसाठी प्रसिद्ध आहे.
या फोटोमध्ये कदम कुटुंबाला या अॅनिमेशन शैलीत साकारण्यात आले असून, त्याला नेटकऱ्यांकडून प्रचंड पसंती मिळत आहे.
योगेश कदम यांनी हा फोटो शेअर करताना लिहिले, “आमच्या कुटुंबाचा Ghibli स्टाइलमधील हा खास क्षण! तंत्रज्ञान आणि कला यांचा सुंदर मिलाफ.”
सध्या Ghibli स्टाइल फोटोंचा ट्रेंड सोशल मीडियावर जोरात सुरू असून, सामान्य नागरिकांपासून ते राजकीय नेत्यांपर्यांत सर्वजण यात सहभागी होत आहेत.
कदम कुटुंबाचा हा फोटोही त्याला अपवाद नाही. रामदास कदम यांच्यासारख्या दिग्गज नेत्यापासून ते योगेश कदम यांच्या मुलांपर्यंत सर्वजण या फोटोमध्ये Ghibli स्टाइलच्या जादुई दुनियेत दिसत आहेत.
हा फोटो पाहून चाहते आणि सोशल मीडिया यूजर्स यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे.
काहींनी तर असे फोटो बनवण्यासाठी Grok AI किंवा ChatGPT GPT-4o सारख्या टूल्स वापरण्याचा सल्लाही दिला आहे.