दापोली:-   दापोली शहर परिसर ‘मिनी महाबळेश्वर’ येथे कडाक्याची थंडी पडली आहे. यावर्षी ११ जानेवारी रोजी मंगळवारी तापमानाची सर्वात कमी म्हणजेच ९.२ अंश नोंद झाली आहे.

डॉ बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापिठाच्या कृषी विभागातील गिम्हवणे येथील हवामान केंद्रावर यावर्षी ११ जानेवारी ही नोंद झाली आहे.

सोमवारी सकाळी ८ पासून मंगळवारी सकाळी ८ वा. पर्यत झालेल्या चोवीस तासातील ही नोंद आहे. आठवड्यापूर्वी हे तापमान ११ अंशावर आले होते.

यावर्षी पडत असलेल्या थंडीमुळे पर्यटक उत्साहात असले तरी अवेळी पडलेला पाऊस आंबा बागायतदारांची चिंता वाढवणारा आहे.

दापोलीत पडत असलेल्या गुलाबी थंडीमुळे पर्यटकांची गर्दी वाढणार असुन यंदाचा थर्टी फस्ट एन्जॉय करण्यासाठि मोठया संख्येने पर्यटक दाखल झाले होते.

दापोली शहर हे समुद्र सपाटीपासून २५० मीटर उंचीवर वसलेले वैशिष्ट्यपूर्ण शहर आहे,त्यामुळे हे कोकणातील मिनी महाबळेश्वर असल्याच म्हटले जात.

एवढ्या उंचीवर असले तरी अवघ्या ७ ते ८ किमीवर समुद्र किनारा असुन या सगळ्या वैशिष्ट्यपुर्ण भौगोलिक रचनेमुळे ब्रिटिशांनी दापोली शहराची निवड ‘कँम्प’ साठी याच शहराची निवड केली होती.

दापोली शहरातील वाढते शहरीकरण व उभी राहणारी सिमेंट काँक्रीटची जंगले यातही दापोलीचे मिनी महाबळेश्वरपण टिकून आहे.