मंडणगड– दुरुस्तीसाठी बंद ठेवण्यात आलेला म्हाप्रळ- आंबेत पूल येत्या जूनमध्ये वाहतुकीसाठी खुला होण्याची शक्यता आहे. तांत्रिकदृष्ट्या अतिशय अवघड समजल्या गेलेल्या पुलाचे काम कधी पूर्ण होणार याची सारेजण वाट पाहत होते.

गेल्या तीन वर्षांपासून म्हाप्रळ-आंबेत पुलाच्या रखडलेल्या कामाला जानेवारी महिन्यात गती मिळाली. सार्वजनिक बांधकाम विभागाने पाच महिन्यांच्या कालावधीत काम पूर्ण केले आहे. सावित्री नदी पुलावरील दुर्घटनेनंतर तत्कालीन बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी या पुलाच्या मजबुतीकरणासाठी 15 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला होता.