दापोली : दापोली नगरपंचायतीने नुकतंच विशेष समित्यांची निवड जाहीर केली आहे. महायुतीने या निवडणुकीमध्ये बाजी मारली आहे.

या समित्या स्थानिक प्रशासनाचे कामकाज सुरळीत चालवण्यासाठी, विकासकामांवर देखरेख ठेवण्यासाठी आणि नागरिकांना आवश्यक सेवा पुरवण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात.

स्थायी समिती सदस्यांची निवड:
निवडणूक विविध राजकीय पक्ष आणि गटांतील सदस्यांचे प्रतिनिधित्व दर्शवते.

स्थायी समिती : मोरे ममता बिपीन या स्थायी समितीच्या अध्यक्ष म्हणून काम करतील, तर रखांगे खालीद अब्दुल्ला उपाध्यक्ष म्हणून काम पाहतील. साळवी जया अजय, शिके प्रिती सतीश आणि लांजेकर अश्विनी अमोल हे इतर सदस्य आहेत.

सार्वजनिक बांधकाम समिती : रखांगे खालीद अब्दुल्ला यांची अध्यक्षपदी निवड झाली आहे. तर तळघरकर महबूब कमरूद्दीन, शिगवण विलास राजाराम, खानविलकर शिवानी सुरेश आणि चिपळूणकर अझीम महंमद हे या समितीचे सदस्य आहेत.

स्वच्छता आणि सार्वजनिक आरोग्य समिती : साळवी जया अजय या समितीच्या अध्यक्ष आहेत. रखांगे अन्वर अब्दुल गफूर, कळकुटके संतोष दत्ताराम, घाग कृपा शशांक आणि खानविलकर शिवानी सुरेश हे सदस्य म्हणून काम करतील.

पाणीपुरवठा व जलनिस्सारण समिती : शिर्के प्रिती सतीश या समितीच्या अध्यक्ष आहेत. रखांगे अन्वर अब्दुल गफूर, शिगवण विलास राजाराम, खानविलकर शिवानी सुरेश आणि घाग कृपा शशांक हे या समितीचे सदस्य आहेत.

महिला व बालकल्याण समिती : लांजेकर अश्विनी अमोल या समितीच्या अध्यक्ष म्हणून काम करतील, तर खानविलकर शिवानी सुरेश उपाध्यक्ष म्हणून काम पाहतील. घाग कृपा शशांक आणि तळघरकर महबूब कमरूद्दीन हे इतर सदस्य आहेत.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नगरसेवक मागील वर्षी प्रमाणे याहीवर्षी गैरहजर राहिले. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध झाली आहे.