दापोलीत मनसे आक्रमक

मराठी पाट्या लावा, अन्यथा खळखट्याक आंदोलन ; मनसेचे शहराध्यक्ष साईराज देसाई यांचा इशारा

दापोली : मुदत संपली तरीही पाट्या ठळक मराठीत नसलेल्या दुकाने व आस्थापना यांच्याविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेना चांगलीच आक्रमक झाली आहे.

यासंदर्भात मनसेने दापोली नगरपंचायतचे मुख्याधिकारी यांना पत्र देऊन ठळक मराठीत पाट्या नसलेल्या दुकानांवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी गुरुवार ३०-११-२३ रोजी केली.

जर दापोली शहरामधील दुकानांवर ५ डिसेंबर पर्यंत मराठी पाट्या लावण्यात आल्या नाहीत तर खळ खट्याक आंदोलन करण्यात येईल असा इशारा मनसेचे शहर अध्यक्ष साईराज देसाई यांनी दिला आहे.

यावेळी उपजिल्हाध्यक्ष सचिन गायकवाड, तालुकाध्यक्ष नितीन साठे, शहराध्यक्ष साईराज देसाई, शहर सचिव हाफिज महालदार, उपशहराध्यक्ष अरविंद पुसाळकर, मनविसे शहराध्यक्ष राहुल शिंदे, विभाग अध्यक्ष वैभव वेल्हाळ उपस्थित होते.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*