मराठा विद्या प्रसारक मंडळी दापोलीच्या वतीने समाज बांधवांचा सत्कार

दापोली : मराठा विद्या प्रसारक मंडळी दापोली संस्थेमार्फत मराठा बोर्डिंग दापोली येते विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

सदर कार्यक्रमांत डॉ. संजय भावे सर यांची डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठा च्या कुलगुरूपदी निवड झाल्याबद्दल मराठा सामजाच्या वतीने जाहीर सत्कार करण्यात आला.

तसेच डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोलीच्या कार्यकारिणी परिषदेवर निवड झाल्याबद्दल श्री. सुनील दळवी यांचा सत्कार करण्यात आला.

बेस्ट पायलट ऑफ इंडिया पुरस्कारप्राप्त झाल्याबद्दल संस्कृती संजीवन साळवी हिचा सत्कार करण्यात आला.

तसेच संदीप खोचरे याची दापोली अर्बन बँक वर बोर्ड मॅनेजमेंट कमिठीचे अध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला .

डॉ.संजय भावे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना आपल्या समाजातील प्रत्येक घटकाचे काम आहे आपण समाजासाठी काहीतरी देणे लागतो.सर्वांनी शेती कडे लक्ष द्या.असे मत व्यक्त केले.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेश कदम यांनी केले व आभार विश्वास काका कदम यांनी केले. यावेळी मराठा समाज बांधव संख्येने उपस्थित होते.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*