सातारा:- सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यात दरवर्षी काळेश्वरी देवी (मांढरदेव) व दावजी बुवा (सुरुर) ही यात्रा आयोजित केली जाते. मात्र, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव व यात्रेच्या निमित्ताने होणारी गर्दी पाहता प्रशासनाच्यावतीने यंदाच्या वर्षीची मांढरदेव यात्रा रद्द करण्यात आली आहे. यात्रेनिमित्त वाईचे प्रांताधिकारी राजेंद्रकुमार जाधव यांनी दि. 10 जानेवारी ते 1 फेब्रुवारी 2022 या कालावधीत 144 कलम लागू केले असून जमावबंदीचे आदेश दिले आहेत.