मंडणगड -तिडे -ठाणे नालासोपारा अशी बससेवा १२ जुनपासुन सुरू

मंडणगड:- तिडे ग्रुप ग्रामपंचायतच्या मागणीवरून मंडणगड -तिडे -ठाणे नालासोपारा अशी बससेवा १२जुनपासुन सुरू करण्यात आली आहे. ही बससेवा मंडणगड येथून दुपारी १३:३० वा सुटून केळवत,कुंबळे,तिडे,तळेघर,सडे,आतखोल,शेनाळे, महाप्रळ,चिंबाव,तुडील,महाड,माणगांव,कोलाड,नागोठणे,वडखल,रामवाडी,पनवेल,कोकणभवन,नेरूळ,कळवा, ठाणे,घोडबंदर,वसई फाटा, नालासोपारा येथे सकाळी ०९ वा पोचणार आहे.

परतीच्या प्रवासाकरीता नालासोपारा येथुन संध्याकाळी ०६:३० वा सुटणार आहे  या बसचे संगणकीय आरक्षण उपलब्ध करून देण्यात आले आहे.या बससेवेचा अधिकाधिक प्रवाशांनी लाभ घ्यावा असे आवाहन विभाग नियंत्रक सुनिल भोकरे,विभागीय वाहतुकचे सचिन सुर्वे,अनंत जाधव मंडणगड आगार व्यवस्थापक हनुमंत फडतरे वाहन परीक्षक श्री भिसे ,कोकण एसटी प्रेमी ग्रुपचे अध्यक्ष अपेक्षित कुळये,उपाध्यक्ष विकास गुरव,संवाद कार्यकारिणी संघ पुणे व पुणे कल्याण मार्गे सावंत वाडी रेल्वे प्रवासी समन्वय समिती,कल्याण सावंतवाडी रेल्वे प्रवासी समन्वय समिती कल्याण दापोली,मंडणगडचे संपर्क प्रमुख तथा तालुकाध्यक्ष श्री वैभव बहुतुले मंडणगड आगाराचे चालक श्री. शिरसाट वाहक श्री. पवार,वाहन परीक्षक विलास जाधव तिडे ग्रामस्थ आसिफ खलफे आदी मान्यवरांनी केले आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*