मंडणगड: मंडणगड तालुक्यातील म्हाप्रळ येथे एका २० वर्षीय तरुणावर धारदार तलवारीने प्राणघातक हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी मंडणगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, संशयित आरोपीला ताब्यात घेण्याची प्रक्रिया पोलिसांनी सुरू केली आहे.

काय आहे नेमकी घटना?
६ मार्च २०२५ रोजी रात्री १०.४५ च्या सुमारास म्हाप्रळ येथील परेरा फार्म हाऊसकडे जाणाऱ्या रस्त्यावर ही घटना घडली. अहमद अब्दुल मझीद मुंगरुस्कर (वय २०) असे जखमी तरुणाचे नाव आहे.

आरोपीने (रा. म्हाप्रळ)  अचानकपणे अहमदवर धारदार तलवारीने हल्ला केला. तंजीमने अहमदच्या डोक्यावर आणि दोन्ही हातांवर वार केले, तसेच त्याला बेदम मारहाण केली.

या हल्ल्यात अहमद गंभीर जखमी झाला असून, त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

पोलीस तपास सुरू
७ मार्च २०२५ रोजी या घटनेची तक्रार मंडणगड पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनी संशयित आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला.

हल्ल्याचे कारण अद्याप अस्पष्ट असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.