नवी मुंबई: कलांश एंटरटेनमेंट आयोजित ‘अस्तित्व नारी सन्मान पुरस्कार २०२५’ च्या दुसऱ्या पर्वात ममता मोरे यांना ‘सर्वोत्कृष्ट सौंदर्य उद्योजिका’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार सोहळा २२ मार्च २०२५ रोजी उरण येथील सिल्वर ओक रिसॉर्टमध्ये आयोजित करण्यात आला होता.
लोकप्रिय मराठी अभिनेत्री प्रिया बेर्डे यांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी कलश एंटरटेनमेंटचे सर्व सदस्य उपस्थित होते.

ममता मोरे यांनी सौंदर्य उद्योगात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून त्यांना हा पुरस्कार देण्यात आला.
‘सीमांच्या पलीकडे’ या संकल्पनेवर आधारित असलेल्या या पुरस्कार सोहळ्यात, विविध क्षेत्रांतील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांना गौरविण्यात आलं
हा पुरस्कार मिळणे माझ्यासाठी खूप मोठा सन्मान आहे. या पुरस्कारामुळे मला माझ्या कामाला अधिक प्रेरणा मिळाली आहे. कलश एंटरटेनमेंटचे मी मनापासून आभारी आहे,
असे ममता बिपिन मोरे यांनी पुरस्कार स्वीकारल्यानंतर सांगितले.
ममता मोरे या दापोली नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा म्हणून ही गेल्या 3 वर्षांपासून काम पाहत आहेत. सध्या त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षा होत आहे.