मात्र शिवानी खानविलकर यांच्या आव्हानाची चर्चा!

दापोली :- दापोली नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिवसेना राष्ट्रवादी आघाडीच्या ममता मोरे या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार आहेत त्यांचा विजयही निश्चित थोडया वेळाने ही निवड दुपारी १२ वाजल्या नंतर जाहिर होईल. शिवसेना व राष्ट्रवादी सव्वा सव्वा वर्षे नगराध्यक्ष पद वाटप शिवसेना राष्ट्रवादी आघाडीत वाटप ठरले आहे.

शिवसेनेच्याच शिवानी खानविलकर या सगळ्यात कमी वयाच्या उमेदवाराने नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी दाखल करून आव्हान देत नवा ट्विस्ट निर्माण केलाय,त्याची चर्चा आहे. शिवसेनेकडुन नगरसेवकांना व्हीप बजावण्यात आला आहे. हा व्हीप शिवानी खानविलकर यांनाही लागू होतो त्यांनी व्हीपविरोधात मतदान केल्यास पक्षाने ठरवल्यास कारवाईचा विचार होऊ शकतो. नगराध्यक्ष उमेदवारी अर्ज दाखल करताना नाराज शिवसैनिकांनी लढवलेल्या शिवसेवा आघाडीच्या कृपा घाग यांची मदत घेतली तसेच शिवसेनेचे आमदार योगेश कदम यांना जाऊन भेटले म्हणून मला संधी नाकारली असा आरोप शिवानी खानविलकर यांनी केलाय तशा स्वरूपाचे एक निवेदनच शिवानी खानविलकर यांनी सोशल मीडियावर व्हायरल केल आहे. तुला पाच वर्षे आमच्यासोबत काम करायच अशीही धमकी देऊन दबाव टाकण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोपही खानविलकर यांनी केला आहे. आपण या अन्याया विषयी त्यामुळे नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीनंतर युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे याना भेटून अन्यायाविरोधात न्याय मागण्यासाठी भेट घेणार असल्याच शिवानी खानविलकर यांनी म्हटले आहे.होय मी नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक होते, माझ्यावर अन्याय झालाय मी शिवसेनेच्या आमदार योगेश कदम याना जाऊन भेटले यात कोणती चूक नाही युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांची भेट घेऊन सगळ्या अन्याय संगणार त्यामुळे नगराध्यक्ष निवडणूकीनंतर हा वाद शिसेनेचे वरिष्ठ नेते कसा सोडवणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागुन राहिले आहे.    

या सगळ्या पार्श्वभूमीवर माजी आमदार सूर्यकांत दळवी यांनी सांगितले की, शिवसेना आदेशाने चालणार पक्ष आहे ममता मोरे या या शिवसेना राष्ट्रवादी आघाडीच्या अधिकृत उमेदवार आहेत बाकी कोण कोणाला जाऊन भेटले हे आम्हाला माहीत नाही.आघाडीत सर्वानुमते जे ठरले त्यामुळे ममता मोरे यांचे नाव निश्चित झाल्याची माहिती दिली.
पक्षाने संधी दिली दापोली शहराचा विकास हेच आपले उद्दिष्ट आहे,बाकी खानविलकर यांनी भरलेल्या अर्जाबद्दल मला काही बोलायच नाही अशी प्रतिक्रिया   शिवसेना राष्ट्रवादी आघाडी नगराध्यक्ष उमेदवार ममता मोरे यांनी दिली.