दापोली: दापोली नगरपंचायत निवडणुक जाहीर झाल्यापासूनच शिवसेना व राष्ट्रवादी यांनी आघाडी केली तर दुसरीकडे शिवसेनेचे बंडखोर उमेदवारांनी शिवसेवा आघाडी स्थापन करुन आव्हान दिले होते. मात्र निकालाअंती महाविकास आघाडीला १४ जागांवर स्पष्ट बहुमत मिळाले होते. तर शिवसेवा विकास आघाडी ला केवळ दोन जागांवर समाधान मानावे लागले तर एक जागेवर भाजप निवडून आला होता. आता नगराध्यक्ष पदासाठी ११ फेब्रुवारी ला निवडणूक होणार आहे. याकरीता महाविकास आघाडीतर्फे शिवसेनेच्या नगरसेविका ममता मोरे यांनी दाखल केला आहे. त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे. शिवसेना व राष्ट्रवादी या दोन्ही पक्षाचे पक्षीय बलाबल 14 असल्याने आघाडीला स्पष्ट बहुमत जनतेने दिली आहे. त्यामुळे शिवसेनेच्या ममता मोरे यांना यश येईल व येणाऱ्या 11 फेब्रुवारी रोजी त्या दापोलीच्या नगराध्यक्ष म्हणून विराजमान होतील. तर दुसरीकडे दापोली शिवसेनेत पुन्हा एकदा नगराध्यक्ष पदावरून बंड दिसून येत असुन राष्ट्रवादी व शिवसेनेच्या अधिकृत उमेदवार सौ ममता मोरे यांच्याविरोधात प्रभाग क्रमांक 10 मधून निवडून आलेल्या नवख्या तरुण उमेदवार म्हणुन शिवसेनेच्या शिवानी खानविलकर यांनी दोन अपक्ष नगरसेवकांच्या पाठिंब्यावर अर्ज दाखल केला आहे.