रत्नागिरी : तौक्ते चक्रीवादळामुळे रत्नागिरी जिल्ह्यात झालेल्या नुकसानीचे पंचनामे लवकरात लवकर करून सर्व बाधितांना मदत मिळण्याच्या दृष्टिकोनातून प्रशासनाने काम करावे, असे निर्देश जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. अनिल परब यांनी दिले. त्यांनी मंगळवारी दूरदृश्य प्रणालीद्वारे झालेल्या बैठकीत नुकसानीचा सविस्तर आढावा घेतला. बैठकीला उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विक्रांत जाधव, रत्नागिरी-सिंधुदुर्गचे खासदार विनायक राऊत, राजापूरचे आमदार राजन साळवी, चिपळूणचे आमदार शेखर निकम, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष उदय बने, जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते.