नागपुरात एक खळबळजनक घटना घडली आहे. एका 23 वर्षीय तरुणीला पेट्रोल टाकून जाळण्यात आले आहे. यामध्ये तिचा मृत्यू झाला आहे. सुराबर्डी जवळील म्हाडा कॉर्टर परिसरातील ही धक्कादायक घटना आहे. मृत तरुणी मंगळवारपासून बेपत्ता होती. काल संध्याकाळी तिचा मृतदेह जळालेल्या अवस्थेत आढळला. मृत तरुणी खामला परिसरात एका खासगी कंपनीत काम करत होती. तरुणीच्या एका मित्राला यासंदर्भात चौकशीकामी ताब्यात घेण्यात आले आहे.