महाराष्ट्र पॉलिटेक्निकचे प्राचार्य प्रा. अरुण ढंग यांना संगणकशास्त्रात पीएच.डी. प्राप्त

मंडणगड: शेनाळे येथील महाराष्ट्र पॉलिटेक्निक महाविद्यालयाचे प्राचार्य प्राध्यापक अरुण ढंग यांना जेजेटी विद्यापीठ, राजस्थान यांच्या वतीने संगणकशास्त्र विषयातील पीएच.डी. पदवी नुकतीच प्रदान करण्यात आली आहे. त्यांनी ‘प्रभावी शिक्षणासाठी उच्च शिक्षणात शिक्षण व्यवस्थापन प्रणालीची अंमलबजावणी आणि विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनाचा अभ्यास’ या विषयावर सखोल संशोधन केले.

प्रा. ढंग यांनी संगणकशास्त्र आणि भौतिकशास्त्र या विषयांमध्ये पदव्युत्तर पदवी तसेच कायद्याची पदवी प्राप्त केली आहे. गेल्या सतरा वर्षांपासून ते शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असून, त्यांनी विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये शोधनिबंध सादर केले आहेत. शैक्षणिक क्षेत्रातील योगदानाबद्दल त्यांना स्टार एज्युकेशन अवॉर्डने सन्मानित करण्यात आले आहे. त्यांनी महाविद्यालयातील विविध विभागांचे कामकाज यशस्वीपणे हाताळले आहे.

या शोधप्रबंधासाठी प्रा. डॉ. प्रज्ञा वानखडे यांचे मार्गदर्शन त्यांना लाभले. तसेच, डॉ. हनुमंत रेणुसे, प्रा. अभिजित देसाई, डॉ. डी. जगताप, डॉ. सचिन भोसले, डॉ. विनायक पुजारी, डॉ. अमित जाधव आणि डॉ. रिंकेश छेडा यांचे मोलाचे सहकार्य त्यांना मिळाले.

प्रा. ढंग यांच्या या यशाबद्दल दळवी एज्युकेशन संस्थेचे अध्यक्ष अजय दळवी, रजिस्ट्रर विशाल नटे यांच्यासह शिक्षक, कर्मचारी आणि तालुक्यातील विविध स्तरांतील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*