महानायक कोरोना पॉझिटिव्ह, ट्विट करून दिली माहिती


मुंबई : महानायक अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. त्यांना अधिक उपचारासाठी खाजगी रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. बच्चन कुटुंबियातील इतरांचे म्हणजे जया बच्चन, ऐश्वर्या राय आणि तिची मुली, स्टाफ सर्वांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

अमिताभ बच्चन यांनी स्वत: च ट्विट करून पॉझिटिव्ह असल्यासंदर्भात माहिती दिली आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे की,

माझी कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. मी हॉस्पिटलमध्ये दाखल झालो आहे. रूग्णालयातील कर्मचारी, माझे कुटुंबिय आणि स्टाफ यांनी कोरोना टेस्ट करून घेतली आहे. त्यांचा अहवाल येणं बाकी आहे. गेल्या दहा दिवासांमध्ये जे जे माझ्या जवळ आले आहेत त्यांना विनंती करतो की त्यांनीही आपली कोरोना टेस्ट करून घ्यावी.

अमिताभ बच्चन यांनी आपल्या तब्येतीबद्दल काही पोस्टमध्ये म्हटलेलं नाहीये. पण आम्हाला सौम्य लक्षणं आहेत अशी माहिती अभिषेक बच्चन यांनं ट्विट करून दिली आहे.

याच दरम्यान अभिनेत्री रेखा यांच्या बंगल्यावर तैनात असलेल्या सुरक्षा रक्षकाला कोरोनाची लागण झाली आहे. मुंबई महानगरपालीकेनं रेखा यांचा बंगला सील करून कंटेन्मेनेट झोन जाहीर केला आहे. तशी नोटीसही त्यांच्या बंगल्यावर लावण्यात आली आहे.

सध्या अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन आणि रेखा सोशियल मीडियावर ट्रेंड होत आहेत. अभिताभ बच्चन लवकरात लवकरच बरे होवोच यासाठी अनेकांनी ट्विट करून सदिच्छा दिल्या आहेत. यामध्ये भाजपा नेते केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, काँग्रेसचे खासदार शकील अहमद, देवेंद्र फडणवीस यांनी सदिच्छा दिल्या.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*