आफ्रोह’ महिला आघाडीच्या राज्य उपाध्यक्षपदी माधुरी मेनकार व राज्य सदस्यपदी उषा पारशे

दापोली: ऑर्गनायझेशन फॉर राईट्स ऑफ ह्यूमन संघटनेच्या पुणे येथे आयोजित केलेल्या राज्य कार्यकारीणीच्या सभेत आफ्रोह महिला आघाडीची राज्य कार्यकारणी घोषित करण्यात आली.या राज्य कार्यकारिणीत रत्नागिरीतील दोन महिला कर्मचा-यांचा समावेश आहे.
या राज्य कार्यकारिणीत रत्नागिरीच्या दापोली तालुक्यातील इनामपांगारी जि. प. क्र.१ च्या मुख्याध्यापिका श्रीमती माधुरी मेनकार यांची महिला आघाडीच्या राज्य उपाध्यक्षपदी तर संगमेश्वर राजवाडी उपकेंद्राच्या आरोग्यसेविका उषा पारशे यांची राज्य कार्यकारिणी सदस्य म्हणून निवड करण्यात आली.

या निवडीबद्दल महिला आघाडीच्या राज्याध्यक्ष अनघा वैद्य, उपाध्यक्ष्य सौ.प्रिया खापरे ,सचिव नीता सोमवंशी ,
कार्याध्यक्ष रुख्मिणी धनी, सहसचिव वनिता नंदनवार, कोषाध्यक्ष वंदना डेकाटे, आफ्रोहचे राज्याध्यक्ष शिवानंद सहारकर ,कार्याध्यक्ष राजेश सोनपरोते ,राज्य प्रसिद्धीप्रमुख गजेंद्र पौनीकर,आफ्रोह महिला आघाडीच्या रत्नागिरी जिल्हाध्यक्ष सौ.माधुरी घावट,आफ्रोह रत्नागिरीचे सचिव बापुराव रोडे,कोषाध्यक्ष किशोर रोडे,नंदा राणे,राजकन्या भांडे,निकिता देशमुख,सुनंदा फुकट,कमल वडाळ,लता वडाळ,गोकुळा धनी,मंगला रोडे,प्रतिभा रोडे यांनी अभिनंदन केले आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*