मुंबईकरांसाठी म्हाडाच्या 3 हजार 15 घरांसाठी निघणार लॉटरी, मंत्री जिंतेद्र आव्हाड यांची माहिती

मुंबई: मुंबईत हक्काचं घरं असणं अनेकांचं स्वप्न असतं. पण वाढणाऱ्या घरांच्या किंमती पाहता अनेकांना हे शक्य नसतं, दरम्यान अशा सर्वांसाठी म्हाडा लॉटरी पद्धतीने बाजारभावापेक्षा कमी किंमतीत घरं उपलब्ध करुन देत असते. ज्यामध्ये प्रत्येकजण अर्ज करु शकतो आणि ज्याचंही नाव लॉटरीत निघेल त्याला कमी किंमतीत हक्काचं अधिकृत घर मुंबईत घेता येतं. दरम्यान ठरावीक काळानंतर विविध ठिकाणी ही घरं उपलब्ध होत असून आता म्हाडा नवीन 3 हजार 15 घरांसाठी लॉटरी काढणार आहे. 2023 च्या सुरुवातीला ही लॉटरी निघेल. मुंबईतील महत्त्वाचं ठिकाण असणाऱ्या गोरेगाव येथील पहाडी याठिकाणी संबधित घरं असून त्यांचं 70 टक्के पूर्ण झालं आहे. बांधकमा मंत्री जिंतेद्र आव्हाड यांनी याबाबतची माहिती दिली आहे.

कोणासाठी किती घरं?
एकूण 3 हजार 15 घरांपैकी दुर्बल घटकांसाठी 1 हजार 947 घरे राखीव आहेत. तर उर्वरीत घरांमधील अल्प उत्पन्न गटासाठी 736, मध्यम उत्पन्न गटासाठी 227 आणि उच्च उत्पन्न गटासाठी 105 घरे उपलब्ध आहेत. 25 लाख किंमतीच्या आतमध्ये वन रुम किचन इतक्या आकाराचे घर या प्रकल्पात घेता येणार आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*