रत्नागिरी- सिंधुदुर्ग जिल्ह्यात कालपासून लॉकडाॅऊन करण्यात आला असून याच पार्श्वभूमीवर गुरूवारी जिल्ह्याचे पालकमंत्री अनिल परब व आपण रत्नागिरी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार असून त्यावेळी बैठक घेण्यात येणार असून त्यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील लॉकडाॅऊनबाबत निर्णय घेण्यात येणार आहे जर जिल्ह्यात लॉकडाॅऊनबाबत निर्णय घ्यायचा झाला तर सर्व घटकांना विश्वासात घेतले जाणार असून जर लॉकडाॅऊन करण्याची वेळ आली तर रत्नागिरी जिल्ह्यातील ,नागरिकांनी ग्रामस्थांनी प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन उच्च तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज ऑनलाईन पत्रकार परिषदेत बोलत होते रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोरोना च्या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणेबाबत आढावा घेतला व त्याबाबतची माहिती त्यांनी पत्रकार परिषदेत दिली.