खेड : कोकणामध्ये अलीकडच्या काळामध्ये बिबट्यांची दहशत प्रचंड वाढली आहे. गेल्या काही वर्षांपासून बिबट्या गावांमध्ये घुसून पाळीव जनावरांवर हल्ला करण्याचे प्रकार खूपच वाढले आहेत.
पूर्वी बिबटे हे रात्री दिसायचे परंतु आता दिवसाढवळ्या देखील ते हल्ले करू लागले आहेत.
यामुळे धनगर बांधवांसह स्थानिक शेतकऱ्यांने मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असून पशुपालन व्यवसाय धोक्यात आला आहे.
सध्या शेती करणेही शेतकरी बांधवांना अवघड होऊन बसले आहे. कारण डुक्कर, माकडे, वानर व अन्य पक्षी शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान करत आहेत. यामुळे अनेक गांवात
लाखो हेक्टर शेती ओसाड असल्याची पाहाण्यास मिळत आहे. शेती व पशुपालन व्यवसाय करणे अवघड झाल्याने धनगर समाजाच्या बांधवांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे.
बिबट्यांचा पशुधनावर होणारे हल्ले, आणि शेतीत येणाऱ्या अडचणी यामुळे अनेक गावांतील धनगर बांधव आपली घरे दारे बंद करून मुंबई, पुणे सारख्या शहरात रोजगारासाठी जाऊ लागले आहेत.
यामुळे हे धनगरवाडे देखिल ओस पडू लागल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.