दापोली :- विधी सेवा समिती दापोली तर्फे आज दापोली सत्र न्यायालय येथे कायदेविषयक जनजागृती अभियान अंतर्गत विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या प्रसंगी माहितीचा अधिकार कायदा 2005 या विषयी ॲड. नूतन परांजपे यानी मार्गदर्शन केले . या कार्यक्रमाला विशेषत्वाने दापोली न्यालयाच्या दिवाणी न्यायाधीश मा. महाडिक मॅडम आवर्जून उपस्थित होत्या. सह दिवाणी न्यायाधीश मा. काटकर मॅडम यानी अध्यक्षीय समरोपामधून मेडियेशन (मध्यस्ती) या विषयावर मार्गदर्शन केले. सरदेसाई भाऊसाहेब यानी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले तर प्रथमेश पाटील यानी आभार व्यक्त केल्यानंतर कार्यक्रमाची सांगता झाली.