कोविड निर्बंधांमुळे हुकणार 22 वा उद्घाटनाचा प्रवास

रत्नागिरी दि. ७ – कोकण रेल्वे मार्गावर नविन गाडी सुरू झाली की उद्घाटनाच्या फेरीत प्रवास करण्याची प्राध्यापक उदय बोडस यांची परंपरा यावेळी मात्र कोविड निर्बंधांमुळे खंडित होणार आहे. 10 जून रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस- मडगाव या नविन एल एच बी डब्यांच्या जनशताब्दी एक्सप्रेस या गाडीने त्यांना प्रवास करता येणार नाही. जर तसा प्रवास करता आला असता तर तो त्यांचा 22 वा उद्घाटनाचा प्रवास ठरला असता. जून 2019 मध्ये जेव्हा कोकणकन्या/ मांडवी एक्सप्रेस चे नविन एल एच बी डब्यांच्या गाडीत परिवर्तन झाले तेंव्हा प्राध्यापक उदय बोडस यानी मडगाव येथून उद्घाटनाचा प्रवास केला होता. तो त्यांचा 21 वा उद्घाटनाचा प्रवास होता. त्यानंतर कोकण रेल्वे मार्गावर बदल होऊन नविन सुरू होणारी जनशताब्दी एक्सप्रेस ही गाडी मात्र कोविड निर्बंधांमुळे हुकणार आहे.

10 जून पासून मान्सून वेळापत्रक लागू झाले की एकाच वेळी 2 जनशताब्दी एक्सप्रेस धावणार आहेत. पहाटे 5 वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून निघणारी गाडी संध्याकाळी 4 वाजता मडगाव येथे पोहोचेल तर त्याच दिवशी दुसरी गाडी मडगाव येथून दुपारी 12.30 वाजता निघेल. या दोन्ही गाड्या नविन एल एच बी डब्यांच्या असणार आहेत. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्हे हे स्तर 4 मध्ये आहेत आणि गोवा राज्य वेगळे असल्याने कोविड संदर्भात चाचण्या अनिवार्य आहेत आणि वयाचा विचार करता प्रवास टाळणे इष्ट असा सल्ला मिळाला आहे म्हणून या वेळी उद्घाटनाचा प्रवास करणार नाही असे प्राध्यापक उदय बोडस यानी सांगितले आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*